Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Good News ! मॉन्सून सोमवारी महाराष्ट्रात दाखल होणार, 'या' जिल्ह्यात हजेरी लागणार

Good News ! मॉन्सून सोमवारी महाराष्ट्रात दाखल होणार, ‘या’ जिल्ह्यात हजेरी लागणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक आनंदाची बातमी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत जाहीर करण्यात आली आहे. येत्या सोमवारपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान केंद्राने मांडला आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मॉन्सून पुढे अरबी समुद्रासह काही भागांमध्ये सरकरणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह गोव्यात आणि आणखी काही भागात मॉन्सून पुढे सरकार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मॉन्सूनसाठी परिस्थिती अनुकुल आहे. त्यामुळे मॉन्सूनचे महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

आज शुक्रवारी ४ जूनला मॉन्सून आणखी पुढे सरकला आहे. IMD नुसार अरबी महासागरात तसेच लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश यासारख्या भागामध्ये मॉन्सून पुढे सरकरला आहे. मॉन्सूनच्या यापुढच्या कालावधीतील प्रवास हा गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने असेल. त्यासाठी आणखी २ ते ३ दिवसांमध्ये मॉन्सून हा महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहिती क्लायमेट रिसर्च एण्ड सर्व्हीसेस पुणे येथील वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. याआधीच तोक्तेच्या चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. पण आता मॉन्सूनसाठीची महाराष्ट्राची प्रतिक्षा संपणार असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मॉन्सूनचे आगमन हे महाराष्ट्र आणि गोव्यात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात मॉन्सूनला सुरूवात होणार

- Advertisement -

मॉन्सून येत्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सक्रीय होणार आहे. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

- Advertisement -