Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Monsoon yellow alert :पुढील ४ दिवस कोकण,मराठवाडा,विदर्भासह राज्यातील १५ जिल्ह्यांना पावसाचा Yellow...

Monsoon yellow alert :पुढील ४ दिवस कोकण,मराठवाडा,विदर्भासह राज्यातील १५ जिल्ह्यांना पावसाचा Yellow Alert

आज मुंबईसह उपनगरात यलो अलर्ट देण्यात आलाय. १५ ते ६४ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झालाय. राज्यासाठी पुढील ४  दिवस महत्त्वाचे असणार आहेत. मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याचप्रमाणे पुढील चार दिवस कोकण,मराठवाडा,विदर्भासह राज्यातील १५ जिल्ह्यांला पावसाचा यलो अलर्ट (YEllow Alert) देण्यात आलाय. (Yellow Alert for next 4 days in 15 districts of state including Konkan, Marathwada, Vidarbha)  पुढील चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईचा विचार केला असता आज मुंबईसह उपनगरात यलो अलर्ट देण्यात आलाय. १५ ते ६४ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात शनिवारी रात्री पासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात देखील आज आणि उद्या चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. नांदेड आणि हिंगोली भागातही काल जोरदार पाऊस होता. नद्या नाले तुडूंब भरुन वाहत होते.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने ८ सप्टेंबर पासून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईत ८ महिन्यात कोरोनाचे ४,८२७ बळी; ४.२५ लाख रुग्ण बाधित

- Advertisement -