घरट्रेंडिंगयंदा तत्काळ तिकिट मिळणार 'या' गोष्टींमुळे

यंदा तत्काळ तिकिट मिळणार ‘या’ गोष्टींमुळे

Subscribe

बोगस सॉफ्टव्हेअरवर आरपीएफची कारवाई

शेवटच्या क्षणी सुट्टीचा बेत आखणाऱ्यांसाठी आता आयत्यावेळीही तत्काळचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या काही निर्णयामुळेच आता तत्काळची तिकिटेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. आयआरसीटीच्या साईटवर उपलब्ध होणारी तत्काळची तिकिटे ही काही सेकंदात संपण्याचा अनुभव आपल्यापैकी सर्वांनी एकदा तरी घेतलाच असेल. पण यापुढच्या काळात मोठ्या प्रमाणात तिकिटे ही सर्वसामान्य युजर्सनाच उपलब्ध होतील अशी काही पाऊले आयआरसीटीसीने उचलली आहेत. आतापर्यंत रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने देशभरात सुरू केलेल्या धडक मोहिमेत ६० तिकिट एजंटचे नेटवर्क उद्धस्त करण्यात यश आले आहे. त्यामुळेच नजीकच्या काळात अधिकाधिक तत्काळ तिकिटे उपलब्ध होणार आहेत.

१.४८ मिनिटात काढली तिकिटे 

भारतीय रेल्वेने क्लिनजिंग ऑपरेशन सुरू केले आहे, त्यामुळे एरव्ही एक ते दोन मिटीटात संपणारी रेल्वेची तिकिटे ही आता प्रवाशांसाठी अधिक वेळ उपलब्ध होतील अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरूण कुमार यांनी दिली आहे. आतापर्यंत तिकिट एजंटमार्फत अनधिकृत सॉफ्टव्हेअरचा वापर करून तत्काळ तिकिटे काही सेंकदातच संपत होती. त्यामधेय एएनएमएस, एमएसी, जागुर यासारख्या सॉफ्टव्हेअरचा समावेश होता. या सॉफ्टव्हेअरमुळे आयआरसीटीसीचे लॉग इन आणि कॅप्चा यासारखी प्रक्रिया बायपास करून तिकिटे काढणे शक्य होत होते. तसेच तिकिट काढण्यासाठी ओटीपीचा वापरही करावा लागत नव्हता. पण सर्वसामान्य जेव्हा तत्काळ तिकिट काढतात तेव्हा या सगळ्या प्रक्रियेतून युजर्सना जावे लागते. सर्वसामान्य युजर्सना एक तिकिट काढण्यासाठी सरासरी २.५५ मिनिटे इतका कालावधी लागतो. पण या सॉफ्टव्हेअरचा वापर करून १.४८ मिनिटातच तिकिट काढणे शक्य होत होते.

- Advertisement -

बोगस सॉफ्टव्हेअरने १०० कोटी कमावले

गेल्या दोन महिन्यात अनेक सापळे लावून या ६० तिकिट एजंटला आरपीएफने पकडले आहे. त्यामुळे आता अनधिकृतपणे कोणतीही तिकिटे निघणार नाहीत याची खबरदारी आरपीएफने घेतली आहे. यापुढे एकही तिकिट अनधिकृत सॉफ्टव्हेअरच्या माध्यमातून निघणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत असे अरूण कुमार म्हणाले. असे प्रकार करण्यासाठी मदत करणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सॉफ्टव्हेअरचा वापर करून तिकिट एजंटने ५० कोटी ते १०० कोटी रूपये कमावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -