घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 100हून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 100हून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास

Subscribe

नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडोहून अधिक लोकाना उष्माघाताचा त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी अनेकांना चक्कर आणि थकवा आल्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडोहून अधिक लोकाना उष्माघाताचा त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी अनेकांना चक्कर आणि थकवा आल्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये श्रीसेवकांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे. (More than 100 people suffer from heat stroke during Maharashtra Bhushan award ceremony vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र हा पुरस्कार सोहळा खुले मैदानात आणि दुपारच्या सुमारास झाल्याने अनेकांना उकाड्याचा त्रास सहन झाला नाही. अनेकांना चक्कर आणि थकवा आल्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यावेळी जवळपास 100 हून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यामध्ये श्रीसेवकांचाही समावेश आहे. श्रीसेवकांसह सर्व नागरिकांना उपचारांसाठी जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – देशभरात घराणेशाहीविरुद्ध बोंबलणाऱ्यांना…; ठाकरेंची अमित शाहांवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -