घरताज्या घडामोडीबेलापूरमध्ये गुप्तधनात सापडली ११ किलो चांदीची १ हजार नाणी

बेलापूरमध्ये गुप्तधनात सापडली ११ किलो चांदीची १ हजार नाणी

Subscribe
बेलापूर गावात घराचे खोदकाम सुरु असताना सापडलेल्या गुप्तधनात ११ किलो जुन्या काळातील नाणी, शिक्के सापडली आहे. या गुप्तधनाचा पंचनामा करून सरकारी पक्षासमक्ष तहसीलदारांनी ही चांदीची नाणी आपल्या ताब्यात घेतली आहे. बेलापुरात सोन्याच्या हंड्यात गुप्तधन सापडल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज तहसीलदार आणि पोलिसांच्या उपस्थितीत बेलापूरातील संबधित वाड्यात जाऊन गुप्तधनाची माहिती घेतली असता हंडा नव्हे तर कळशी सापडली आणि सोने नव्हे तर चांदी असल्याचे उघड झाले आहे.
माहितीनुसार बेलापूरमध्ये राजेश खटोड यांचे बाजारतळालगत घर आहे. जुन्या वाड्याच्या जागेवर पाच सहा वर्षांपूर्वी त्यांनी हे घर बांधले आहे. घरात भविष्यात लग्न समारंभ असल्याने वाड्याच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत गार्डनचे काम करून झाडे लावण्यात येत होते. दरम्यान झाडे लावण्यासाठी खड्डे खोदत असतांना दोन अडीच फुटावर गुप्तधनाचा हंडा सापडला, अशी जोरदार चर्चा बेलापुर आणि परिसरात सुरू होती. या गुप्तधनाचा बोभाटा संपूर्ण जिल्ह्यात झाल्यानंतर संबधित जागामालकाने जिल्ह्याधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. त्यानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते या गुप्तधनाचा ताबा घेण्यात आला.
यावेळी पीएसआय सुरडे, तलाठी भाऊसाहेब खाडे, मंडळ अधिकारी गोसावी, तसेच पोलीस पाटील अशोक प्रधान, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे, ट्रेंझरी अधिकारी राहिज यांच्यासह राजेश खटोड, रवी खटोड,  सुधीर नवले, देविदास देसाई, दिलीप दायमा भाऊ डाकले आदींची उपस्थिती होती. या गुप्तधनात 11 किलो चांदीची 1046 चांदीचे शिक्के तसेच जुन्या राणीच्या काळातील नाणी, 1 रुपयाचे 915 शिक्के तसेच इतर चार आणे व आठ आणेचे नाणी आढळून आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -