Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पाच वर्षात १४ हजार ५९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

पाच वर्षात १४ हजार ५९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

Subscribe

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ८ हजार ९४७ आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र असून ५ हजार ४३० प्रकरणे मदतीस अपात्र ठरली आहेत.

कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि गरीबीमुळे राज्यात ऑक्टोबर २०१४ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत १४ हजार ५९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. यापैकी ८ हजार ९४७ आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र असून ५ हजार ४३० प्रकरणे मदतीस अपात्र ठरली आहेत, तर २१४ प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित असल्याचे लेखी उत्तर देण्यात आले आहे. विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
नोव्हेंबरमध्ये ३०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी १४९ आत्महत्यांची प्रकरणे पात्र ४४ प्रकरणे अपात्र तर ११५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे लेखी उत्तर देताना वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने काही उपाययोजना आखल्या आहेत का? असा प्रश्न सदस्यांनी लेखी प्रश्नात विचारला होता. त्यावर उत्तर देताना म्हटले आहे की, शेती पिकांसाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशन व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाय योजना, शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी समृद्धी योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना तसेच पथदर्शी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम राबविला जात असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -