Homeमहाराष्ट्रBest Bus Accident : तीन वर्षात 69 बळी, 145 गंभीर; 82 किरकोळ...

Best Bus Accident : तीन वर्षात 69 बळी, 145 गंभीर; 82 किरकोळ जखमी

Subscribe

बेस्ट उपक्रमातील इलेक्ट्रिक बस गाडीचा कुर्ला येथे सोमवारी (10 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याने त्यामध्ये 7 जणांचा बळी गेला असून 42 जण जखमी आहेत. दरम्यान, या घटनेनंतर बेस्ट उपक्रमातील मागील अपघातांची झाडाझडती घेतली असता गेल्या तीन वर्षात (2022 ते 2024) बेस्ट बस आणि भाडे तत्वावरील बसगाड्यांचे मिळून अंदाजे 200 पेक्षाही जास्त अपघात झाले आहेत.

मुंबई : बेस्ट उपक्रमातील इलेक्ट्रिक बस गाडीचा कुर्ला येथे सोमवारी (10 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याने त्यामध्ये 7 जणांचा बळी गेला असून 42 जण जखमी आहेत. दरम्यान, या घटनेनंतर बेस्ट उपक्रमातील मागील अपघातांची झाडाझडती घेतली असता गेल्या तीन वर्षात (2022 ते 2024) बेस्ट बस आणि भाडे तत्वावरील बसगाड्यांचे मिळून अंदाजे 200 पेक्षाही जास्त अपघात झाले आहेत. (More than 200 accidents 69 fatalities occurred in the last three years through the BEST bus accident)

सोमवारी कुर्ला येथे झालेली दुर्घटना धरून गेल्या तीन वर्षात तब्बल 69 जणांचे बळी गेले आहेत. तसेच, 145 जण गंभीर तर 82 किरकोळ जखमी झाल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्यांच्या अपघातात 3 वर्षात 22 बळी गेले आहेत. मात्र भाडे तत्वावरील बसगाड्यांच्या अपघातात 47 बळी गेले आहेत. त्यामुळे भाडे तत्वावरील बसगाड्या भविष्यात उपक्रमात चालू ठेवायच्या की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वास्तविक, भाजपाने देखील भाडे तत्वावरील बसगाड्या उपक्रमात चालविण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता बेस्ट उपक्रमालाही त्यावर गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

हेही वाचा – Dahisar- Bhayander Link Road: दहिसर-भाईंदर लिंक रोडला पर्यावरण विभागाची मंजुरी

दरम्यान, भाडे तत्वावरील बसगाडयांमुळे झालेल्या अपघातात 2022 मध्ये 13 जणांचे बळी गेले, 8 जण गंभीर ते 1 जण किरकोळ जखमी झाला. 2023 मध्ये 7 जणांचे बळी गेले, 4 जण गंभीर ते 2 जण किरकोळ जखमी झाले. 2024 मध्ये 27 जणांचे बळी गेले, 62 जण गंभीर तर 82 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे भाडे तत्वावरील बसगाड्यांच्या अपघातात गेल्या 3 वर्षात एकूण 47 जणांचे बळी गेले आहेत. तसेच, 62 जण गंभीर तर 54 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसगाडयांमुळे झालेल्या अपघातात 2022 मध्ये 8 जणांचे बळी गेले, 32 जण गंभीर ते 11 जण किरकोळ जखमी झाले. 2023 मध्ये 10 जणांचे बळी गेले, 30 जण गंभीर ते 15 जण किरकोळ जखमी झाले. 2024 मध्ये 4 जणांचे बळी गेले, 21 जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे गेल्या 3 वर्षात
बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसगाडयांमुळे झालेल्या अपघातात एकूण 22 जणांचे बळी गेले आहेत. तसेच, 83 जण गंभीर तर 28 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा – Kurla Bus Accident : कंत्राटी कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे…; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

बेस्ट उपक्रमातील बस चालक आणि वाहक यांच्याबाबत माहिती 

बेस्ट उपक्रम -: 7,212 चालक, तर 7,423 वाहक

भाडे तत्वावरील -: 6,563 चालक, तर 2,340 वाहक


Edited By Rohit Patil