घरCORONA UPDATEकोरोनाच्या भितीने निघालेले गावी, कारचा टायर फुटून झाला अपघात, दोन ठार!

कोरोनाच्या भितीने निघालेले गावी, कारचा टायर फुटून झाला अपघात, दोन ठार!

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या भीतीने जाधव कुटुंबानी पैठण येथे आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी गाडीत चालकासह चारजण प्रवास करत होते.

नाशिक – औरंगाबाद रोडवर इंडिगो कारचा टायर फुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाशिक येथून आपल्या गावी पैठण तालुक्यातील बिडकीनेला जात असल्याचे समजत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या भीतीने जाधव कुटुंबानी पैठण येथे आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी गाडीत चालकासह चारजण प्रवास करत होते. यादरम्यान गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. गीता जाधव आणि विराज जाधव असं मृत आई, मुलाचे नाव आहे. तर जखमींमध्ये विराट जाधव, मयूर जाधव आणि कार चालकाचा समावेश आहे.

- Advertisement -

सध्या दोशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोणीही घराबाहेर पडू नयेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र नेर नागरिक घाबरून आपल्या गावी जात आहेत.

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १०२४ वर पोहचली आहे. तर २७ जाणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी महाराष्ट्रात कोरोनाचे १२ नवे रुग्ण. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर-नाशिक प्रत्येकी १. राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २१५वर पोहचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -