घरताज्या घडामोडीआईला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर!

आईला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर!

Subscribe

संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी तत्परता दाखवत आईवर अंत्यसंस्कार करुन दीड दिवसात कामावर रुजू झाले आहेत.

सध्या देशावर करोनाचे संकट कोसळले आहे. हे संकट असतानाच आईच्या निधनाची वार्ता समजल्याने संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे दुखी झाले आहेत. मात्र, असे असताना देखील दुख कवटाळून न बसता राष्ट्रीय कर्तव्यालाही त्या अधिकाऱ्याने तितकेच महत्त्व दिले आहे. अश्रूंना बांध घालून आईला अग्नी दिल्यानंतर अवघ्या दीडच दिवसात प्रांताधिकारी कर्तव्यावर हजर झाले आहेत.

संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी ही कर्तव्य तत्परता दाखवली आहे. २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथे त्यांची आई विमल यांचे निधन झाल्याचे त्यांना कळले. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशांची काटेकोर अंमबजावणी होण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचा समन्वय साधण्याची कसरत सुरू असतानाच हे संकट त्यांच्यावर ओढवले होते. मात्र, त्यांनी त्यातून वाट काढत त्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले आणि स्वत: च्या गाडीने जळगाव गाठले. त्यानंतर आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि दीड दिवसातच ते कामावर रुजू झाले. त्यांच्या या कर्तव्यतत्परतेची चर्चा महसूलसह सर्व शासकिय विभागात सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘करोनाची चाचणी करुन घे’, सांगणे पडले महागात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -