भीषण! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले, महाड तालुक्यातील घटना

सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने रागाच्या भरात आपल्या सहाही चिमुकल्यांना बोरगाव जवळील शेतातील एका विहिरी मध्ये फेकून दिले. ही विहीर सुमारे दोनशे फूट खोल असल्याने या सर्व मुलांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला.

रागाच्या भरात एका महिलेने आपल्या सहा लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याने या सहाही मुलांचा मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील बोरगाव येथे घडली आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या व माणुसकीला काळीमा फासणा-या या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे.

मूळ उत्तर प्रदेश येथील व सध्या शेलटोली येथे राहणाऱ्या रुना चिखरु साहनी ( वय 30) या विवाहित महिलेचे आपल्या पतीसोबत भांडण झाल्याने तिने रागातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने रागाच्या भरात आपल्या सहाही चिमुकल्यांना बोरगाव जवळील शेतातील एका विहिरी मध्ये फेकून दिले. ही विहीर सुमारे दोनशे फूट खोल असल्याने या सर्व मुलांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे.

दुपारी अत्यंत निर्दयपणे हे कृत्य केल्यानंतर ही महिला रात्री आठ वाजता महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये हजर झाली व तेने केलेल्या कृत्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने या घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली. महाडचे आमदार भरत गोगावले हे देखील तातडीने घटनास्थळी रवाना झाले या विहिरी मध्ये शिडी टाकून लहान मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते.ग्रामस्थ व साळुखे रेस्क्यु टिमकडून हे काम सुरु होते.अंधार झाला असल्याने या कामात अडचणीही येत होत्या. अखेर सर्व लहान मुलांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.हे दृश्य ह्दयद्रावक होते.या चिमुरड्यांचे मृतदेह पाहून अनेकांना पाधर फुटला. आहेत. रोशनी  (10 वर्षे), करिष्मा (8 वर्षे), रेश्मा (6 वर्षे) विद्या (5 वर्षे), शिवराज  (3 वर्षे), राधा  ( 1.5 वर्षे) अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या महिलेचा पती चिखरु साहनी व रुना साहनी यांना ताब्यात घेतले आहे.