घरताज्या घडामोडीअंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार : मंगलप्रभात लोढा

अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार : मंगलप्रभात लोढा

Subscribe

लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक घेत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थानी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत.

मुंबई : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक घेत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थानी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

‘राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. शासन अंगणवाड्याच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना शासन राबवत आहे’, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

- Advertisement -

‘आज दालमिया फांउडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाडी दुरूस्ती, भागीरथी फांउडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्ती, कॉरबेट फाउंडेशन पुणे येथे १६ अंगणवाडी दुरूस्ती व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी, युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन तसेच क्षमता वृध्दीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत’, असेही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.


हेही वाचा – आम्ही वाट पाहतोय… 2024मधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नितीश कुमारांनी दिले संकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -