घरताज्या घडामोडीकात्रज घाटात नवीन बोगद्याच्यावर डोंगराला आग

कात्रज घाटात नवीन बोगद्याच्यावर डोंगराला आग

Subscribe

आगीमुळे अनेक झाडे जळून खाक झाली आहेत.

कात्रज घाटात तयार करण्यात आलेल्या नवीन बोगद्याच्या डोंगराला आग लागली आहे. जवळपास ४ ते ५ किलोमीटरपर्यंत डोंगराला ही आग लागली आहे. आगीचे प्रमाण प्रचंड असल्याचे दिसत आहे. कात्रज परिसरातूनही ही आग सहज आणि स्पष्टपणे दिसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रर्थीचे प्रयत्न केले जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. डोंगराला लागलेल्या या आगीत लहान मोठे प्राणी ,पक्षी आगीत नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कात्रज घाटात शिंदेवाडी आधी हॉटेल चुल मटण येथे असणाऱ्या रस्त्यासमोरच्या बोगद्याला आग लागली. यावेळी पुणे विभागातील कात्रजचे वनपाल समीर इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही आग घाटाच्या पलीकडील बाजूस असल्याचे सांगितले, त्यामुळे भोर विभागाच्या वनपालांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. घाटाच्या पलीकडील भाग हा भोर परिसरात येत असून अलीकडील भाग हा पुणे विभागात येत असल्याची माहितीही इंगळे यांनी दिली.

याबाबत वनरक्षक एन. एस. पगडे यांनी सांगितले की, ही आग वन विभागाच्या क्षेत्रात नसून खासगी मालकीच्या क्षेत्रात आहे. आमच्या क्षेत्रात आग आली तर ती विझवण्यासाठी आमची पूर्वतयारी झाली आहे. जाळ रेषाही काढली असून नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही. या डोंगरावर घनदाट जंगल आहे. लागलेल्या आगीमुळे अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. त्याचप्रमाणे अनेत पक्ष्यांच्या घरट्यांचेही मोठ् नुकसान झाले आहे वाऱ्यामुळे ही आग पसरत गेल्याची शक्यता वर्तवण्यात येक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आगडोंब! वर्सोवात २५ गॅस सिलिंडरचा स्फोट, सातार्‍यात पाच खासगी शिवशाही जळल्या

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -