Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाफेडच्या कांदा खरेदीत नियमांचा डोंगर; बाजारात भाव नाही अन् नाफेडकडे वाव नाही

नाफेडच्या कांदा खरेदीत नियमांचा डोंगर; बाजारात भाव नाही अन् नाफेडकडे वाव नाही

Subscribe

नाशिक : एकीकडे नाफेडच्या (NAFED) माध्यमातून कांदा खरेदी सुरू असताना आता नाफेडमार्फत कांदा खरेदीबाबत होर्डिंग लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यावर कांदा खरेदीबाबत अनेक अटी शेतकर्‍यांवर लादण्यात आल्या असून, वास येत असलेला, विळा लागलेला, काजळी बसलेला कांदा स्वीकारला जाणार नाही, अशा अटींचा समावेश आहे.

नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी नाफेडमार्फत बाजार समिती पातळीवर तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश काढले असले तरी अद्याप ही खरेदी सुरू झालेली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मालाला भाव कमी मिळतो आहे. तसेच, नाफेडने अद्याप खरेदी सुरू केलेली नसल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे नाफेडने कांदा खरेदीसाठी लावलेल्या नियम व अटी पाहता शेतकर्‍यांचा कांदा नाफेड केंद्रावर विक्री होणार तरी कसा, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. (Onion issue)

अशा आहेत नियम व अटी

- Advertisement -

नाफेड मार्फत कांदा खरेदीला सुरुवात झाली असून, नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती परिसरात खरेदी केंद्र सुरू आहे. या खरेदी केंद्राबाहेर नाफेडमार्फत होर्डिंग लावण्यात आले आहेत. यात शेतकरी बांधवांसाठी सूचना दिलेल्या आहेत. यात प्रतिहेक्टर 280 क्विंटलपेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही. दर्जेदार 45 मिमीच्या पुढचा चांगला कांदा चालेल, असे सूचित करण्यात आले आहे. तर खालील गुणवत्ता असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही (यात विळा लागलेला, पत्ती लागलेला, काजळी असलेला, रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, गरम मऊ असलेला, बुरशीजन्य, वास येत असलेला, मुक्त बेले असलेला कांदा स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्टपणे लिहिलेले आहे.

शेतकर्‍यांची तक्रार काय

सध्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात नाफेडकडून पैसे यायला बराच वेळ लागतो. अजूनही गेल्यावर्षी खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. समजा खरेदीच्यावेळी दर १५०० रूपये असेल व १५ दिवसांनी शेतकर्‍यांना कांद्याचे पैसे देताना हाच दर २५०० असेल तर ज्या दिवशी पैसे अदा कराल, त्या दिवसाचे दर द्या, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा असते. त्यातूनच अनेकदा वादाचे प्रसंग घडतात. कांद्याचे पैसे उशिराने मिळत असल्याने शेतकरी नाईलाजाने पुन्हा व्यापार्‍यांकडे कमी भावात कांदा विक्रीला घेऊन जातात.

अशी असते नाफेडची कांदा खरेदी प्रक्रिया

  • नाफेडची कांदाखरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत होते
  • या कंपन्या शेतकर्‍यांचे आणि नाफेडचे प्रतिनिधी म्हणून काम करतात
  • शेतकरी कंपन्यांना खरेदी केलेला माल सांभाळण्यासाठी नाफेड विशिष्ट शुल्क अदा करते
  • सरकारच्या आवश्यकतेप्रमाणे नाफेडच्या निर्देशानुसार कांदा बाजारात येतो
  • साठवणुकीदरम्यान सुमारे १८ टक्के कांदा खराब झाला तर ते गृहीत धरले जाते
  • अपेक्षित प्रमाणात कांदा नाफेडला परत दिला नाही तर नाफेड संबंधित शेतकरी उत्पादक कंपनीकडून खरेदीदराच्या पाचपट वसुली करते
  • या अनुभवामुळे चार ते पाच महिने साठवता येईल, अशाच दर्जाचा कांदा शेतकरी कंपन्या खरेदी करतात.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -