महाराष्ट्राची शिखर कन्या प्रियंका मोहितेला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान; वाचा प्रियंकाचा साहसी प्रवास

Mountaineer Priyanka Mohite to receive Tenzing Norgay National Adventure Award
महाराष्ट्राची शिखर कन्या प्रियंका मोहितेला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान; वाचा प्रियंकाचा साहसी प्रवास

१३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राची शिखर कन्या प्रियंका मंगेश मोहिते हिला राष्ट्रीय साहसी पुरस्काराने गौरविण्यात आले. सातत्यपूर्वक यशस्वी कामगिरीसाठी ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०२१’ने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात प्रियंकाला आले. वयाच्या २८व्या वर्षीय प्रियंकाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

जगातील १४ अष्टहजारी हिमशिखरांपैकी ४ हिमशिखरांवर यशस्वीरित्या चढाई करणारी प्रियंका महाराष्ट्रातील पहिली महिला गिर्यारोहक आहे. प्रियंका मोहिते ही मूळची सातारची आहे. यावर्षी १६ एप्रिलला तिने जगातील १०वे उंच हिमशिखर अन्नपूर्णाची चढाई केली होती. सर्वात खडतर पर्वतशिखरावर यशस्वी चढाई करणारी प्रियंका पहिलीच भारतीय महिला ठरली. यापूर्वी प्रियंकाने माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू अशा ८ हजार मीटर उंचीवरची चार शिखरं सर केली आहेत. बीबीसी या वृत्तसंस्थेशी बोलताना तिने ८ हजार मीटरवरील जास्तीत जास्त शिखर सर करणार असल्याचे सांगितले होते.

माहितीनुसार अन्नपूर्णा शिखर चढाई करताना प्रियंकासोबत त्याच दिवशी उत्तराखंडची महिला गिर्यारोहक शीतलने योगेश गार्ब्यालच्या सोबत सर केले होते. तसेच याच दिवशी पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या टीमदेखील अन्नपूर्णा शिखरची यशस्वरित्या चढाई केली होती. एकाच दिवशी महाराष्ट्राच्या सहा आणि एकूण आठ भारतीयांनी अन्नपूर्णा शिखरावर तिरंगा फडकवला होता.

दरम्यान १९९३पासून जमीन, पाणी, पर्वत आणि आकाशातील साहसांकरिता ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ देण्याची सुरुवात झाली. सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरींसाठी प्रियंका मोहितेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हेही वाचा – Gallantry Awards 2021: विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला वीर चक्र !