घरताज्या घडामोडीजिल्हा बॅंकेत अध्यक्ष बदलाच्या हालचाली

जिल्हा बॅंकेत अध्यक्ष बदलाच्या हालचाली

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. त्यादृष्टीने संचालकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते. 

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 29 मे 2015 रोजी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार नरेंद्र दराडे हे बॅंकेचे अध्यक्ष झाले होते. तत्पूर्वी, राज्यात सत्तातर झाले आणि भाजप, शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष केदा आहेर अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांच्या कार्यकाळात बॅंकेची आर्थिक गाडा रुळावर येण्यास मदत झाली. नोकर भरती आणि कर्ज वाटपात अनियमितता झाल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. अध्यक्ष आहेर यांनी सहा महिने मुदतवाढ मिळवण्यात यश मिळवले. मात्र, राज्यात आता महाविकास आघाडी चे सरकार स्थापन झाल्याने पुन्हा बॅंकेत अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. यासाठी काही संचालकांनी मंगळवार (दि.२६) रोजी गुप्त बैठकही घेतल्याचे समजते. त्यामुळे बॅंकेचे राजकारण पुन्हा तापले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -