दुसऱ्यांच्या कामावर जाऊन फोटोसेशन करायची मला सवय नाही, खासदार धनंजय महाडिकांचा मंडलिक यांना टोला

राज्यसभेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात जल्लोष साजरा केला. महाडिक यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्यातील एका कार्यक्रमात महाडिक यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्यूत्तर म्हणून खासदार धनंजय महाडिकांनी मंडलिक यांना टोला लगावला आहे.

दुसऱ्यांच्या कामावर जाऊन फोटोसेशन करायची मला सवय नाही

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात खासदार मंडलिक यांनी केलेल्या विकास कामांची यादी जाहीर करावी. मंडलिकांनी कोणाचं तरी एकूण खोटं बोलणं बंद करावं. मुळात दुसऱ्यांच्या कामावर जाऊन फोटोसेशन करायची मला सवय नाही, असा टोला धनंजय महाडिकांनी मंडलिक यांच्यावर लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शेतकरी सामान्य माणूस त्यांच्यासाठी काम करणार आहे. दिल्लीमध्ये उत्तम नेटवर्क असल्यामुळे मला नव्याने तयारी करायची गरज नाही, असंही महाडिक म्हणाले.

नक्की काय म्हणाले मंडलिक?

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्यातील एका कार्यक्रमात धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला होता. आम्ही केलेल्या कामाचे श्रेयही उद्या महाडिक सांगतील. सगळी कामे मीच केली असे सांगतील, अशा शब्दांत मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर निशाणा शाधला होता. मात्र, कोल्हापुरातून महाडिक यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.


हेही वाचा : ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे पुण्यातील रुग्णालयात दाखल