Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत एमआयएमची उडी, मविआच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत एमआयएमची उडी, मविआच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Subscribe

महाराष्ट्रातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड या विधानसभा मतदारसंघांसाठी 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, पुण्यातील दोन्ही मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत एमआयएमचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपने या निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरूवात केली असतानाच ओवेसींच्या एमआयएमनंही या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली, त्यानंतर पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्यानंतर खासदार जलील यांनी दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दोन्ही मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा टक्का मोठा आहे. तर कसबा पेठ या मतदारसंघात अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु चिंचवड विधानसभा मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदारांची मतं निर्णायक ठरतात. त्यामुळे एमआयएमनं या पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे.

लक्ष्मण पांडुरंग जगतापांचे निधन

- Advertisement -

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे जेष्ठ आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे मंगळवार 3 जानेवारी रोजी सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. आमदार जगताप हे गेली 2 वर्षांपासून आजारी होते. निधनापूर्वी मागील सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले.

मुक्ता टिळक यांचे निधन

भाजपाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे बुधवार 22 डिसेंबर 2022 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


हेही वाचा : कसबा आणि पिंपरीमधील पोटनिवडणूक बिनविरोध? अजित पवार म्हणतात नाक खुपसणे…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -