Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदे सरकारने केलं, नवनीत राणांची टोलेबाजी

ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदे सरकारने केलं, नवनीत राणांची टोलेबाजी

Subscribe

शिंदे गट आणि भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. अशातच खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टोलेबाजी करत ठाकरे सरकारला जे जमलं नाही ते शिंदे सरकारने केलं, अशी खोचक टीका नवनीत राणांनी केली आहे.

पहिला सर्वात मोठा निर्णय म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. तर दुसरा सर्वात मोठा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यावरून नवनीत राणांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या निर्णयावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिंदे सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच हे जनतेच्या हिताचे सरकार असल्याचे देखील राणांनी म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोलवर ५ रूपये आणि डिझेलवर ३ रूपये अशा प्रकारचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच हे नवे दर आज मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहेत.


- Advertisement -

हेही वाचा : द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -