Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र उद्धव ठाकरेंमुळेच न्यायालयात हजेरी लावावी लागतेय; नवनीत राणांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंमुळेच न्यायालयात हजेरी लावावी लागतेय; नवनीत राणांची प्रतिक्रिया

Subscribe

नवनीत राणा म्हणल्या की, प्रत्येकवेळी न्यायालयात हजर राहावं लागतं. हजेरी लावावी लागते. ऐकून घ्यावं लागतं, ही सर्व उद्धव ठाकरेंची देणं आहे. फक्त हनुमान चालिसा वाचेन असं म्हटलं होतं त्याचंचं हे सर्व सुरु आहे.

तत्कालीन ठाकरे सरकारच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण प्रकरणावरुन खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यता आली होती. या सदर प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नवनीत राणा या उशिराने पोहोचल्या. त्या उशिरा आल्याने न्यायमूर्तींनी त्यांना सुनावलं. न्यायमुर्तींनी सुनावल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. तसचं, आपलं दु:ख ही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. ( MP Navneet Rana given statement that have to present in court due to Matoshree Hanuman chalisa case reason Uddhav Thackeray )

नवनीत राणा म्हणल्या की, प्रत्येकवेळी न्यायालयात हजर राहावं लागतं. हजेरी लावावी लागते. ऐकून घ्यावं लागतं, ही सर्व उद्धव ठाकरेंची देणं आहे. फक्त हनुमान चालिसा वाचेन असं म्हटलं होतं त्याचंचं हे सर्व सुरु आहे. कधी डोंबिवली, बोरिवली तर कधी कुठे असं बोलवलं जातं. अनेक केसेस सुरु आहेत. वेगवेगळी प्रकरण सुरु आहेत. रवी राणा यांना आज बरं नाही,म्हणून ते हजर झाले नाहीत. परंतु मला एक महिला म्हणून खूप वाईट वाटतं. महिला म्हणून कोर्टात येणं आणि या सर्व गोष्टी सांभाळणं मनाला खूप वाईट वाटतं, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. कोर्टाचे आदेश हे आम्हाला मान्य असतील आणि जेव्हा जेव्हा न्यायालयातून बोलवणं येईल, तेव्हा आम्ही हजर राहू असं नवनीत राणा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

नेमकं प्रकरण काय? 

- Advertisement -

गेल्यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवला होता. यावेळी राज ठाकरेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला होता. राज ठाकरेंच्या याच आवाहानाला पाठिंबा देत राणा दाम्प्त्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले. मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी न झाल्यास मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचू असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निश्चय केला.

यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. राणा दाम्प्त्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्य अटकेतही होते. मात्र, त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. सध्या ते या प्रकरणी जामीनावर आहे.

- Advertisement -

( हेही वाचा :खासदार नवनीत राणा यांचा जन्मदिवस नेमका कधी? तीन तारखा आल्या समोर! )

दिल्ली प्रकरणावर नवनीत राणांनी व्यक्त केला रोष

राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा हत्येचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. साहिल खान नावाच्या व्यक्तीवर मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे.

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, अशा क्रूर लोकांना तत्काळ फाशी द्यावी. अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी या निर्घृण हत्येचा निषेध केला असून आरोपींना तातडीने फाशी देण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, अशा क्रूर मानसिकचेच्या व्यक्तीला तत्काळ फाशी द्यावी अशी माझी मागणी आहे आणि मी हा मुद्दा संसदेतही मांडणार आहे.

- Advertisment -