Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकूण नवनीत राणा यांना अश्रू अनावर, मुख्यमंत्र्यांवार डागलं टीकास्त्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकूण नवनीत राणा यांना अश्रू अनावर, मुख्यमंत्र्यांवार डागलं टीकास्त्र

नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश

Related Story

- Advertisement -

राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणाता पाऊस पडला आहे. नद्या, ओढे दुथडी भरुन वाहू लागल्यामुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून मोठं नुकसान झालं आहे. खासदार नवनीत राणा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

खासदार नवनीत राणा लोकसभेचं कामकाज आटोपून अमरावतीमधील खार, तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा या भागाची पाहणी केली आहे. अमरावती जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे पाहून नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले आहेत. अतिवृष्टी मुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले ,गावगावांचा संपर्क तुटला,क्षतीग्रस्त पुलांची पाहणी करुन खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाड चालत पंढरपूरला गेले होते तसेच त्यांनी विदर्भातील पावासमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना गाडी चालवत विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला दौरा केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत विदर्भातील नुकसानीची पाहणी करणार नाहीत तोपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांचे किती नुकसान झालं आहे. ते समजणारन नाही. जर दौराच केला नाही तर मदत कशी दिली जाणार असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -