Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नवनीत राणांना शिवसेनेच्या कथित लेटरहेडवरुन अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी

नवनीत राणांना शिवसेनेच्या कथित लेटरहेडवरुन अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अ‌ॅसिड हल्ल्याची धमक देण्यात आली आहे. चेहऱ्यावर अ‌ॅसिड टाकून जीवेमारण्याची धमकी नीनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. शिवसेनेच्या कथित लेटरहेडवरुन ही धमकी देण्यात आल्याचं नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या धमकीच्या पत्रात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही. मात्र, या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, या पत्रात ८ दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची जाहीर माफी मागा, असा इशारा दिला आहे.

संसदेत ८ फेब्रुवारीला खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर भाषण केलं होतं. या भाषणात राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टोलेबाजी केली होती. त्या भाषणाचा संदर्भ या पत्रामध्ये केला आहे. धमकीसाठी जे पत्र वापरलं आहे, त्या पत्रावर कोणताही पत्ता नाही आहे. केवळ शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आहे. नवनीत राणा यांनी दिल्लीतील नॉर्थ एवेन्यू पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. कारण त्यांना या ठिकाणीच पत्र प्राप्त झालं होतं. हे धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -