Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुखी श्रीरामचे नारे, पण विनाहेल्मेट बुलेट चालवल्याने खासदार नवनीत राणा ट्रोल

मुखी श्रीरामचे नारे, पण विनाहेल्मेट बुलेट चालवल्याने खासदार नवनीत राणा ट्रोल

Subscribe

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या बिनधास्तपणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राम नवमीच्या दिवशी त्या चर्चेत आल्या आहेत. बुलेट चालवताना हेल्मेट न घातल्याने त्यांना आता नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आजही त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आज मोठ्या उत्साहाने खासदार नवनीत राणा या रामनवमी साजरी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा आजच्या दिवसाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. भगवा स्कार्फ परिधान करून नवनीत राणा या बुलेट या दुचाकीवर स्वार झालेल्या पाहायला मिळाल्या. पण बुलेट चालवताना हेल्मेट न घातल्याने नेटकऱ्यांकडून आता खासदार नवनीत राणा यांना ट्रोल करण्यात येत आहे.

आजच्या दिवसासाठी खासदार नवनीत राणा यांनी हा खास व्हिडीओ तयार केला असल्याचे समजते. काळ्या रंगाचा चुडीदार परिधान करून, डोक्याला भगव्या रंगाचा स्कार्फ गुंडाळून नवनीत राणा या बुलेटवर स्वार झाल्या. “आम्ही अखंड विश्वाचे राजा श्रीरामचे भक्त आहोत.. आम्ही पराभवाची चिंता करत नाही आणि विजयाचा उल्लेख करत नाही. जय श्री राम..” असे त्या या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसून येत आहेत. यानंतर त्या हेल्मेट न घालता वेगाने बुलेट चालवताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. पण मिसेस राणा यांनी हेल्मेट न घालता बुलेट चालवल्याने त्यांना नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. याआधी देखील खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना हेल्मेट न घालता बुलेट चालवल्याने त्यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे राणा पती-पत्नी यांना वाहतुकीच्या नियमांची फारशी चिंता नसल्याचेच दिसून येत आहे.

- Advertisement -

खासदार नवनीत राणा यांनी हा व्हिडीओ त्यांचा ट्वीटरला देखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी “राम नाम का नारा है, हर घर भगवा छाया है, श्री राम नवमी के शुभ अवसर पर बुलेट राइडिंग करते हुए। जय श्री राम।। जय हनुमान।।” असे लिहिले आहे. पण श्री राम नवमीच्या शुभ दिनी नवनीत राणा यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने यावरून देखील त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. आजच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्यात येऊ नये, असे नेटकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – सनातन धर्माला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही : सरसंघचालक मोहन भागवत

- Advertisment -