घरताज्या घडामोडीलहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वेळीच उपाययोजना करण्यासाठी राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान...

लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वेळीच उपाययोजना करण्यासाठी राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Subscribe

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसत आहे. कोरोना प्रादुर्भाव हा १० वर्षांखालील मुलांमध्ये वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक असून वेळीच उपाययोजना करा, अशी विनंती एका पत्राच्या माध्यमातून खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.

राहुल शेवाळे यांच्या पत्राच्या माध्यमातून विविध राज्यांतील कोरोनाबाधित लहान मुलांच्या आकडेवारी देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. तसेच पत्रात लहान मुलांकरिता कोरोनाची लस उपलब्ध नसल्याची महत्त्वाची बाब नमूद केले आहे.

- Advertisement -

पत्रात काय लिहिले आहे?

लहान मुलांमधील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव वेळीच लक्षात घेता देशातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क अशी व्यवस्था लहान मुलांसाठी करणे गरजेचे आहे. तसेच देशभरात लहान मुलांसाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य करावे.

लहान मुलांमधील वाढत्या कोरोनाबाबत ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स’ चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान १ मार्च ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्रात ६० हजार ६८४ मुलांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये ९ हजार ८८२ मुलं ही ५ वर्षांखालील आहेत. मुंबई महानगरातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या २० टक्के रुग्णसंख्या लहान मुलांची आहे.

- Advertisement -

केंद्राच्या माहितीनुसार, देशातील ५ राज्यांमध्ये ७९ हजार ६८८ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनुक्रमे ५ हजार ९४०, ७ हजार ३२७, ३ हजार ४ आणि २ हजार ७२२ कोरोनाबाधित मुलांचा आकडा आहे. हरयाणा सरकारच्या माहितीनुसार, ११ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ११ हजार ३४४ लहान मुलं कोरोनाबाधित आढळले आहेत.


हेही वाचा – आरोग्यमंत्र्यांकडून पॉझिटिव्ह बातमी! राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटबाबत दिले अपडेट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -