घरठाणेनवीन वर्षात वर्सोवा पुल होणार खुला; खासदार राजन विचारे यांची माहिती

नवीन वर्षात वर्सोवा पुल होणार खुला; खासदार राजन विचारे यांची माहिती

Subscribe

ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला वर्सोवा पूल नागरिकांसाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुंबई ते सुरत असा असलेला ४ मार्गिकेचा पूल खुला करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांना शुक्रवारी पुलाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान संबंधित प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच या मार्गावरून (पी सी यु) पॅसेंजर कार युनिटच्या अहवालानुसार या मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत. तर, या पुलामुळे मुंबई, ठाणे तसेच सुरत कडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी या पुलाची पाहणी करण्याकरिता नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी मुकुंदा अत्तरडे, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, नरेश मणेरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे, गटनेते नीलम ढवण, शहर प्रमुख लक्ष्मण कंदलगावकर, जयराम मेसे, शिवशंकर तिवारी, जितेंद्र पाठक, ग्राहक कक्षाचे सदानंद घोसाळकर व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मी. लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्याठिकाणी फक्त पूल जोडण्याचे काम बाकी आहे. एकूण मार्ग २.२५ किमीचा आहे.

या वर्सोवा पुलाच्या कामाचे ११ जानेवारी २०१८ रोजी भूमिपूजन होऊन सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी वन खात्याच्या परवानग्या मिळवून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन व संसदेत सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरु होता. त्यामुळेच २९ एप्रिल २०१९ रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. कोविडमध्ये सुद्धा या रस्त्याच्या मार्गिकाचे काम सुरू ठेवण्यासाठी खासदार राजन विचारे पाठपुरावा करीत होते. आज आपल्या पाठपुरावाला यश आले आहे, अशी माहिती ही खासदारांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : उद्या मुख्यमंत्री ठाण्यात, शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता अभियानाचे शुभारंभ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -