घरठाणेठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर, खासदार राजन विचारेंचा शिंदे गटाला टोला

ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर, खासदार राजन विचारेंचा शिंदे गटाला टोला

Subscribe

ठाणे : राज्यातील दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळानंतर दहीहंडीचा उत्साह मावळला होता. परंतु यंदा दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच, अनेक आयोजकांकडून लाखोंच्या रुपयांच्या बक्षिसाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी यंदा ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थराबरोबर एकतेचा बाज, संस्कृती चा सांज आणि हिंदुत्वाचा आवाज दिसणार आहे. मुंबई, ठाणे आणि महिला गोविंदा पथकासाठी वेगवेगळ्या हंड्या उभारण्यात येणार आहेत. तसेच गोविंदा पथकासह प्रेषक्षांनाही काही इजा झाल्यास त्यांनाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या राजकीय घडामोडीत केवळ निष्ठावंत पक्षात राहिले असून खासकरून ठाण्यात निष्ठा दाखवने गरजेचे आहे. त्यामुळेच हंडीत निष्ठेचे थर लावण्यात येणार असल्याचे म्हणत राजन विचारेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ठाण्यातील जांभळीनाका भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने केले आहे. या उत्सवात मुंबईतील पथकाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये, ठाण्यातील गोविंदा पथकाला आनंद दिघे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये आणि महिला पथकाला मिनाताई ठाकरे यांच्या नावाने ५१ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार असल्याची माहिती आयोजक विचारे यांनी दिली.

- Advertisement -

या सोहळ्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. टेंभीनाक्यावर धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरु केला असून त्याचबरोबर जांभळीनाक्यावर दिघे यांच्याच आर्शीवादाने दहीहंडी उत्सव होत आहे. दोन्ही उत्सव हे आमचेच असून दोन्ही ठिकाणचे उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा : दहीहंडीबद्दल मनसेची बदलती भूमिका, उंच थरांना विरोध ते बक्षिसांची खैरात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -