घरताज्या घडामोडीमराठा समाज अस्वस्थ, दुःखी, शरद पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे - संभाजीराजे छत्रपती

मराठा समाज अस्वस्थ, दुःखी, शरद पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे – संभाजीराजे छत्रपती

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेणार

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि समाजाला दिशा दाखवण्यासाठी संभाजीराजे सरसावले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. राजेंनी शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. मराठा समाज अत्यंत दुःखी, अस्वस्थ आहे. त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे असे संभाजीराजे छत्रपती यांनी शरद पवार यांना सांगितले आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवरही चर्चा केली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने तयार केलेला कायदा रद्द केल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्र दौरा करत होते. त्यांना दौरा आटोपला असून आता मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेणार आहेत. या भेटी घेतल्यानंतर २८ मे शुक्रवारी ४ वाजता संभाजीराजे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये शरद पवारांना सांगितले की, मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे. तसेच एकंदरीत त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगितली असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांसारख्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असेही राजेंनी शरद पवार यांना सांगितले आहे.

तसेच शरद पवारांनी भेटीदरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहे. मराठा समाजावर अन्या होत असून यामधून त्यांना बाहेर काढणे गरजेचे असल्याचेही राजेंनी म्हटलंय राज्यातील इतर गोष्टींवरही चर्चा करण्यात आली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -