घरताज्या घडामोडीछत्रपती घराण्यात जन्मः भाग्याची गोष्ट पण लोककल्याणाची सर्वथा जाणीव, संभाजीराजेंची वाढदिवशी भावूक...

छत्रपती घराण्यात जन्मः भाग्याची गोष्ट पण लोककल्याणाची सर्वथा जाणीव, संभाजीराजेंची वाढदिवशी भावूक पोस्ट

Subscribe

छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे.

भाजप नेते आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज ५२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त संभाजीराजेंनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. परंतु छत्रपती घराण्यात जन्मःताच लोककल्याणाची दायित्व आपल्यावरती असल्याची जाणीव सर्वथा असल्याचे संभाजीराजे म्हणाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवशी कोल्हापूरात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत असते. यावेळी राजे जिल्ह्याबाहेर असल्यामुळे लोकांना शुभेच्छा देण्यास येऊ नये असे आवाहनसुद्धा संभाजीराजेंनी केले आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ५२ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त एका नवोदित कलाकाराने गाण्यातुन शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु वाढदिवसानिमित्त संभाजीराजेंनी एक भावूक पोस्ट केली आहे. ‘आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शिछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे’ अशा आशयाचे ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

- Advertisement -

छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे. माझ्या जीवनात आलेली प्रत्येक संधी ही मी लोककल्याणाचे साधन म्हणूनच स्वीकारली व त्याकरिताच ती वापरली देखील असे संभाजीराजे म्हणाले. माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील, मात्र माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची गरज असल्याचे संभाजीराजे म्हणाले आहेत.

- Advertisement -

कोल्हापूरला उपस्थित राहणार नाही

संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरात गर्दी होत असते. राजेंना शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोकांची ये-जा सुरु असते. परंतु यंदा संभाजीराजे कोल्हापूरात नसल्यामुळे चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोल्हापूरात न येण्याचे आवाहन केलं आहे. प्रतिवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये राहण्याचा नेहमीच प्रयत्न असतो, मात्र उद्या काही कारणांस्तव कोल्हापूर येथे उपस्थित असणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोक कोल्हापूरला येऊन माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत असतात, छत्रपती घराण्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात ; या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करीत आहे. तरी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व विश्वास माझ्या पाठीशी सदैव आहेतच, याचा मला आनंद आहे. असे संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरून भाजपने टाकला अखेरचा फास

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -