Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी कुणावर न्याय, अन्याय झाला असेल तर... राऊतांचं अजित पवारांबाबत मोठं विधान

कुणावर न्याय, अन्याय झाला असेल तर… राऊतांचं अजित पवारांबाबत मोठं विधान

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली. मात्र, अजित पवारांना यामधून डावलण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

कुणावर न्याय, अन्याय झाला असेल तर…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २५ वर्ष झाली आहेत. पण जर २५ वर्षानंतर नवीन घडामोडी घडत असतील आणि नवीन जबाबदारी पवारांनी कुणावर दिली असेल. तर आम्ही त्यावर काय बोलावं? शरद पवार हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी नवीन नियुक्त्या आणि जबाबदाऱ्या दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सव साजरा होतोय, त्याला आमच्याकडून शुभेच्छा, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्ष आहे. परंतु त्यांच्या अंतर्गत पक्षातील घडामोडींवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. कुणावर जर न्याय, अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती स्वत:हून बोलेल. त्यामध्ये बाहेरच्यांही का बोलावं? त्यांचं वकीलपत्र त्यांनी कुणाला दिलंय का? हे मला माहिती नाही. पण शरद पवार कोणताही निर्णय घेण्यात समर्थ आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवारांचे पंख कापले का?

शरद पवारांनी अजित पवारांचे पंख कापले का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राऊत म्हणाले की, मला तसं वाटत नाही. कारण अजित पवार हे विधिमंडळात पक्षाचे नेते आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. ही दोन्ही पदं फार महत्त्वाची आहेत, असंही राऊत म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : Rohit Pawar : दादांकडे विरोधी पक्षनेत्याचं पद पण… रोहित पवारांची प्रतिक्रिया


 

- Advertisment -