शिंदे गटातील ‘त्या’ मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांना धमकीचे २ फोन?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी राऊतांना दिवसभरात धमकीचे दोन फोन आल्याचे समजते. काल शिंदे गटातील नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याचे बोलले जात आहे.

shiv sena mp sanjay raut criticize central govt narendra modi amit shah on maharashtra karnataka border dispute

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी राऊतांना दिवसभरात धमकीचे दोन फोन आल्याचे समजते. काल शिंदे गटातील नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून चिघळत चालला आहे. याच वादावरून काल राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. (Mp Sanjay Raut Gets Threatening Calls After Minister Shambhuraj Desai Warns Him Over Maharashtra Karnataka Border Issue)

खासदार संजय राऊत यांनी काल सकाळी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारमधील मंत्री कर्नाटकात जाणार होते. मात्र त्यांनी दौरे रद्द केले. त्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचीही पत्रकार परिषद झाली. यावेळी शंभुराज देसाई यांनी “संजय राऊत साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते जामीनावर आहेत. निर्दोष सुटलेले नाहीत. राऊत यांनी आपल्या तोंडाला आवर घालावा. अन्यथा त्यांना पुन्हा आत जावे लागेल”, असा इशारा दिला. दरम्यान, शंभुराज देसाई यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राऊत यांना धमकीचे दोन फोन आले. राऊत यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या धमकीनंतर आज संजय राऊत यांनी “माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल”, असे म्हटले. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली. त्यामागे सरकारचा हात नाही. पोलीस यंत्रणेची समिती याबद्दलचे निर्णय घेते. त्यात आयपीएस अधिकारी, गृह सचिव, डीजींचा समावेश असतो. सुरक्षासंबंधीचे अहवाल पाहून त्यांच्याकडून कोणाला सुरक्षा पुरवायची, याबद्दलचा निर्णय होत असतो”, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. शिवाय, “संजय राऊत वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांना आलेला फोन खरा होता की खोटा याचा तपास केला जाईल. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल”, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.


हेही वाचा – …तर २०२४च्या निवडणुकांमध्ये देशात परिवर्तन होईल; संजय राऊतांचा भाजपाविरोधात प्लॅन