विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.., खासदार संजय राऊतांचे संकेत

shivsena mla sanjay raut on eknath shinde shivsena mla security maharashtra politics

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याची दाट शक्यता असून महाविकास आघाडी सरकार आता कोसळणार हे नक्की झालं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट करत विधानसभेचा बरखास्तीच्या दिशेने प्रवास असल्याचे म्हटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तासाभरात राजीनामा देतील असे समजते.

यापूर्वी युवासेना प्रमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँण्डलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे आता केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनामाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे.

महाविकास आघाडी सरकार हे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे आणि त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही तासात आजच राजीनामा देतील.

भाजपला वाटत असेल ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. शिवसेनेने अनेकदा राखेतून जन्म घेऊन अनेकदा गरुडझेप घेतलेली आहे. हा गेल्या ५६ वर्षांचा इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आणि सहकारी आहेत. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम करतोय, त्यांच्यासोबत जी चर्चा सुरू आहे, ती सकारात्मक असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं आहे.


हेही वाचा : एकनाथ शिंदेंना सोडणं आम्हालाही परवडणारं नाही, संजय राऊत हतबल