घरताज्या घडामोडीमला खोके नको मी मोदींचा माणूस.., संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मला खोके नको मी मोदींचा माणूस.., संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Subscribe

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जन्मदिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले होते. तिथे महाराष्ट्राचं गुंतवणुकीचं कार्यालय केलं. मुख्यमंत्री बसले होते. इतर फंटरही होते. तिथे २-४ गोरे लोक आले. अचानक घुसले हे गडबडले त्यांच्याशी बोलायचं काय?, मग ते कुठल्या देशाचे पंतप्रधान म्हणाले अरे, तुम्हीच हे, किती खोके देऊ तुम्हाला येता आमच्या पक्षात?, नाही मला खोके नको मी मोदींचा माणूस. आम्हीही मोदींची माणसे. मग त्यांनी सेल्फी काढला. हा फोटो मोदींना दाखवा म्हटलं. षण्मुखानंद हॉलमध्ये येताना चार गोरे दिसले. ते मला बोलले मी पोलंडचा पंतप्रधान, बेल्झियमचा पंतप्रधान आहे. आम्ही उद्धव ठाकरेंची माणसं आहोत असं ते बोलले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकायला आले. अशा गंमतीजमती महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

- Advertisement -

शिवसेना प्रमुख हे आजन्म शिवसेना प्रमुख आणि उद्धव ठाकरे हे आपले सदैव पक्षप्रमुख… जनतेने बहाल केलेली ही पदं आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सर्व कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाहीत. शिवसेना धगधगता निखारा आहे. शिवसेना हा रक्तात्तुन निर्माण झालेला इतिहास आहे. हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास कोणत्याही शाईला मिटवता येत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

सेनेचा इतिहास माहिती करायचा असेल तर या तयार झालेल्या मोदी सेनाने सीमा पार करून पाहाव्यात. मी तीन दिवस भारत जोडो यात्रेसाठी काश्मीरला होतो. मी काश्मिरी पंडितांच्या कार्यक्रमाला गेलो. गेले सहा महिने काश्मिरी पंडित आपल्या मागण्यांसाठी जम्मूला धरणं धरून बसलेत. आजही काश्मीर हिंदू पंडितांसाठी सुरक्षित नाही. हजारो काश्मीर पंडीत आपलं घरदार, सर्वस्व सोडून जम्मूच्या निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत. तरिही सरकार त्यांच्या मागे तगादा लावत आहेत की, तुम्ही पुन्हा काश्मीरमध्ये जा… कारण त्यांना दाखवायचंय की, काश्मीर सुरक्षित आहे. पण काश्मीर पंडीत तिथे पोहोचले की त्यांच्या हत्या होतात. त्याला आपण टार्गेट किलींग म्हणतो. जोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही. तोपर्यंत आम्हाला काश्मीरला पाठवू नका, अशा त्यांच्या मागण्या आहेत. परंतु केंद्र सरकार काश्मीर पंडितांचा बळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी घेत आहेत, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हल्ली देवांच्या मूर्तीही चोरायला लागल्या. पण देवाची मूर्ती चोरणारे मंदीर उभारत नाही. तर ते विकतात. हे चोर आहेत. दुर्लक्ष करा. ते आले तसे नष्ट होतील. पावसाळ्यात गांडुळ येतात. त्यानंतर त्यांचे अस्तित्व संपते. संपूर्ण देशात शिवसेना म्हट्लं की, आजही उद्धव ठाकरे समोर येतात. जो उत्साह आज दिसतोय हे शिवसेनेचे भविष्य आहे. पूर्वी आपल्याला म्हणायचे तीन चाकी सरकार. परंतु आज आपल्या तीन चाकी रिक्षाला प्रकाश आंबेडकरांचे चौथे चाक लागले आहे, असं संजय राऊत म्हणाले.

एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी एका तळ्यात दगड टाकला आणि सोबतच्यांना विचारलं, दगड का बुडाला? तिथे संजय राऊत नावाचा एक अतिशहाणा होता. तो म्हणाला- दगड बुडाला कारण त्याने तुमचा हात सोडला. तसंच आजही हे चाळीस दगड बुडाल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला राऊतांनी लगावला.


हेही वाचा : भाजपविरोधात अनेक पक्षांची मोर्चेबांधणी करण्याचं नेतृत्व ठाकरेंकडेच.., अंधारेंचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -