‘सरकारची पालखीतून मिरवणूक काढायची की…’, राऊतांचा नार्वेकरांना टोला

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे-फडणवीस सरकारमधील 50 आमदार हक्कभंग आणणार आहेत. याबाबत पत्र तयार करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला.

Dismiss Assembly Speaker who gave information before result, Sanjay Raut's demand

‘या राज्यात घटनाबाह्यस सरकार आहे. त्याबाबत त्यांनी लवकर निर्णय घ्यायला हवा. या घटनाबाह्य सरकारला श्रद्धांजली व्हायची की त्या सरकारची पालखीत बसवून मिरवणूक काढायची याबाबत निर्णय घ्यावा’, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. (MP Sanjay Raut Slams CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis And Rahul Narwekar)

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे-फडणवीस सरकारमधील 50 आमदार हक्कभंग आणणार आहेत. याबाबत पत्र तयार करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

“तो त्यांचा अधिकार आहे. हक्कभंगाचा अर्थ त्यांनी आधी समजून घेणे गरजेचे आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नाही. विधानसभेचे अध्यक्ष खूर्चीवर बसलेले नाहीत. विधिमंडळाच्या बाहेर असताना आपण सामान्य नागरिक असतो. मी स्वत: काही विधान केलीत, त्यामध्ये राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लंडनमधून प्रतिक्रिया दिली, त्यावर भाष्य केले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“आम्हाला जो कायदा कळतो त्या कायद्यानुसार, न्यायालयाच्या न्यायमूर्तीसमोर एखादा खटला येतो. त्या खटल्याबाबत कधीच मुलाखतीत भाष्य केले जात नाही. पण नार्वेकर यांनी मुलाखतीत जे भाष्य केले. ज्या निर्णयावर ते बोलत होते, त्यामध्ये आमचा पक्ष आहे. त्यामुळे त्याला प्रतिवाद करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी पक्षाची बाजू मांडली तर, हा हक्कभंग कसा होऊ शकतो”, असेही संजय राऊत म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करा असे मी बोललो. तसेच, राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले त्यापूर्वी त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. त्यावर मी भाष्य केले तर हक्कभंग कसा? राहुल नार्वेकर शिवसेनेचे प्रमुख नेते होते. शिवसेनेकडून निवडणूक लढले. राष्ट्रवादीचे आमदार राहिले. त्यांचे कुटुंब जनता दलात होते, त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात आले. पक्षांतर हा राहुल नार्वेकरांचा इतिहास आहे, त्यांचा हा इतिहास तुम्ही पुसणार कसा? त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद राजकीय विचारधारा असलेल्या एका उच्चस्तरीय व्यक्तीलाच मिळते”, असा टोला संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना लगावला.

“आमच्या कोणते अधिकार आहेत, तर आम्ही त्यांना धमकी देऊ. त्यांनी 2028 पर्यंत निर्णय दिला तरी काही हरकत नाही. पण या राज्यात घटनाबाह्यस सरकार आहे. त्याबाबत त्यांनी लवकर निर्णय घ्यायला हवा. या घटनाबाह्य सरकारला श्रद्धांजली व्हायची की त्या सरकारची पालखीत बसवून मिरवणूक काढायची याबाबत निर्णय घ्यावा”, असाही टोला राऊतांनी लगावला.


हेही वाचा – Pakistan : इम्रान खान यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेरले; दहशतवादी लपल्याची माहिती