Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाराष्ट्रात कायद्याचे राज्य स्थापित झाले की नाही? हे सिद्ध होणे अद्याप बाकी...

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य स्थापित झाले की नाही? हे सिद्ध होणे अद्याप बाकी – संजय राऊत

Subscribe

'कायद्याचे राज्य महाराष्ट्रात स्थापित झाले की, नाही याचा निर्णय व्हायचा आहे. हा निर्णय झाल्यानंतर ते घटनात्मक राज्य होते', अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

‘कायद्याचे राज्य महाराष्ट्रात स्थापित झाले की, नाही याचा निर्णय व्हायचा आहे. हा निर्णय झाल्यानंतर ते घटनात्मक राज्य होते’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संजय राऊत यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. या जामीनानंतर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. (MP Sanjay Raut Slams Maharashtra CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis)

खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. “कायद्याचे राज्य महाराष्ट्रात स्थापित झाले की, नाही याचा निर्णय व्हायचा आहे. हा निर्णय झाल्यानंतर ते घटनात्मक राज्य होते. अशावेळी मी सांगितले होते आणि लोकांची भावना असेल की, जर हे राज्य घटनाबाह्य आहे तर, घटनाबाह्य राज्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही? असा माझा सवाल होता. सरकारने यावर गुन्हे दाखल केले. ठीक आहे करू द्या, गुन्हे दाखल. मला याप्रकरणात न्यायालयाने सवलत दिली. त्याबद्दल मी न्यायालयाचा आभारी आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“पण तरीही या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या मनात प्रश्न कायम आहे की, महाराष्ट्रातील हे सरकार आणि राज्य घटनात्मकरित्या आहे की नाही? पण लोकांना वाटते की हे राज्य घटनाबाह्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचेही हेच मत आहे. सरकार हे घटनाबाह्य पद्धतीने काम करतेय, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले”, असेही संजय राऊत म्हणाले.

“या जगभरात सरकारवर कोणी टीका करत नाही का? महाराष्ट्रात याआधी सरकारवर टीका झाली नाही का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका झाली नाही का? ठाकरेंच्या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेवर टीका झाली नाही का? तेव्हा आम्ही कोणालाच तुरुंगात टाकले नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन; पोलीस सतर्क

- Advertisment -