Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय झालेय', नितेश राणेंवर राऊतांचा पलटवार

‘काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय झालेय’, नितेश राणेंवर राऊतांचा पलटवार

Related Story

- Advertisement -

‘शिवसेना भवन आता वसुलीभवन झालंय’, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी माहिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमात केली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘काही ठिकाणी काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय झाली असेल, असं मी कुठे तरी वाचलं होत. या सगळ्याविषयी आम्ही बोलण्यापेक्षा आमचे जे स्थानिक शाखाप्रमुख आहेत, ते बोलतील. हा शाखाप्रमुख स्तरावरील विषय आहे.’ तसेच राऊत पुढे म्हणाले की, प्रसाद लाड यांना देखील उत्तर शाखाप्रमुख देतील.

आणखीन काय म्हणाले संजय राऊत? 

संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे झारखंड आणि छत्तीसगडमध्ये सरकार पडणार नाही. पेगॅसस, पैशाची लालच किंवा ईडी, सीबीआय यामुळे सरकार पडणार असेल तर केव्हाच पडले असते.’

- Advertisement -

सामनातील रोखठोक संदर्भात संजय राऊत म्हणाले की, ‘गरीबी वाढतेय, बेकारी वाढतेय, नोटबंदी आणि लॉकडाऊन असे विषय देशांमध्ये आहेत, ज्याच्यामुळे २३ टक्के लोकं दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. त्यांच्याकडे या क्षणी कोणतेही काम नाही, उपजिवीकेचे कोणतेही साधन नाही. उद्या रस्त्यावरती येऊन भीक मागण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. महापूरात लोकांची जी अवस्था झाली आहे ती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने यावर पाऊल उचलने गरजेचे आहे. रस्त्यावर भीक मागणं यावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली म्हटले आहे. त्यामुळे मी आज असा लेख लिहिला आहे. रोटी, कपडा, बकान आपल्या जनतेला तुम्ही देऊ शकत नाहीत. यामुळे भीक मागण्यासाठी मजबूर होतात. ७० वर्षामध्ये गरीबी हटवूपासून अच्छे दिन आयेंगे या सर्व घोषणा व्यर्थ आहेत.’

- Advertisement -