घर ताज्या घडामोडी देशातील लोकशाही न्यायव्यवस्था संकटात - खासदार संजय राऊत

देशातील लोकशाही न्यायव्यवस्था संकटात – खासदार संजय राऊत

Subscribe

शिवसेनेतून जो गट फुटून गेला आणि घटनाबाह्य पद्धतीने ते विधिमंडळात गेले व सरकार स्थापन केलं. ज्यावर सर्वोच्च न्यायलयाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. विधिमंडळाच्या बाहेरचं हे चोरमंडळ आहे, अशी माझी भूमिका होती. पण विधिमंडळानं स्वत:ला चोरमंडळ म्हणून घेतल्याचा प्रकार जो दाखवण्यात आला तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण त्याच्यासोबत माझा काडीमात्र संबंध नाही. देशातील लोकशाही न्यायव्यवस्था संकटात आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यसभेच्या सदस्याचे हक्कभंगासंदर्भातले विषय असतात. ते विषय राज्यसभेच्या चेअरमनकडं जातात. पण ते विषय त्यांच्यापर्यंत गेले असतील तर मी माझी बाजू मांडीन, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

सगळ्यात कृत्य बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात सुरू आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने घटनेची रखवाली करायची असते. ते घटनेचे चौकीदार आहेत. पण घटनेच्या पदावर बसलेला व्यक्तीच घटनेचे मारेकरी ठरतात. हे आपण माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबतीत पाहिलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल या संस्थेवर ताशेरे मारले. महाराष्ट्र विधानसभेला एक प्रतिष्ठा आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने निष्पक्ष पद्धतीने न्याय करायचो असतो ही आमची भूमिका आहे. राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मला काहीही आक्षेप नाही, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : ठरलं! कर्नाटकला ‘या’ तारखेला मिळणार नवा मुख्यमंत्री; खर्गेंनी सोडवला तिढा


- Advertisement -

 

- Advertisment -