‘संशयित आरोपीने पाहिला होता लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ, दारुच्या नशेत दिली संजय राऊतांना धमकी’

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने जीवे मारण्याची धमकी आली होती. राहुल उत्तम तळेकर (23) असे या धमकी देणाऱ्याचे नाव आहे. राहुल हा जालन्याचा रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने जीवे मारण्याची धमकी आली होती. राहुल उत्तम तळेकर (23) असे या धमकी देणाऱ्याचे नाव आहे. राहुल हा जालन्याचा रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. सध्या हा पुण्याच एक हॉटेल चालवत असल्याते पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कांजुरमार्ग पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. (MP Sanjay Raut threat case accused arrested police Information)

कांजुरमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांना धमकी दिलेल्या पत्रातील माहितीनुसार आरोपीचा तपास केला. या आरोपीचा कोणत्याही गँगशी संबंध नसल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणाचा सविस्तर तपास केला जाणार असून, तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. या आरोपी राहुलने 10 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहिला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याने लॉरेन्स बिश्नोईचे नाव ऐकले होते. त्यामुळे त्याने लॉरेन्सचे नाव सांगितल्याचे प्राथमिक माहितीत सांगितले.

संजय राऊत यांनी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी राहुल तळेकर विरोधात 68/23, 506(2), 504 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहितीही यावेळी पोलिसांनी दिली.

धमकीच्या मेसेजमध्ये नेमके काय?

संजय राऊत यांना आलेल्या या धमकीच्या मॅसेजमुळे खळबळ उडाली आहे. हा धमकीचा मेसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. हिंदूविरोधी असल्यामुळे मारुन टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप करु. लॉरेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स, तयारी करके रखना, असे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. तसेच, या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.


हेही वाचा – लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाने खासदार संजय राऊत यांना जीव मारण्याची धमकी