शरद पवारांना पंतप्रधानपदापर्यंत पोहचू न देण्यात काँग्रेसचा मोठा वाटा – खा. राऊत

शरद पवारांना पंतप्रधानपदापर्यंत पोहचू न देण्यात काँग्रेसचा मोठा हातभार आहे हे मी पूर्वीपासूनच सांगत आलो असल्याचे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिमकमधील पत्रकार परिषदेत केले.

Sanjay Raut
राणे, कपिल पाटील, भारती पवार हे राष्ट्रवादी-शिवसेनेचे प्रॉडक्ट; राऊतांची खोचक प्रतिक्रिया

शरद पवारांना पंतप्रधानपदापर्यंत पोहचू न देण्यात काँग्रेसचा मोठा हातभार आहे हे मी पूर्वीपासूनच सांगत आलो असल्याचे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिमकमधील पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले की, शरद पवार हे या देशातील गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, त्यांना पंतप्रधानपदाची संधी याआधीच मिळायला हवी होती. असे मोठे नेते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. देशाचे नेतृत्व करण्यासाठी सगळ्यात जास्त क्षमता असलेला नेता म्हणून त्यांचाच उल्लेख करायला हवा. पण त्यांचे कतृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांचे कतृत्वाची भीती वाटत आली आहे. विशेषत: काँग्रेसमधील उत्तरेकडील नेत्यांना त्यांची भीती वाटत आली आहे. त्यांच्या व्देषापोटीच पवारांना पंतप्रधानपदापर्यंत जाऊ दिले गेले नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवर लिहीलेल्या एका लेखात म्हटले आहे की, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर काँग्रेसला सावरण्यासाठी पवार यांना पक्षाचे अध्यक्ष करावे असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये होता. पण दिल्लीतील दरबारींनी डाव टाकला आणि पवार नको म्हणून नरसिंह राव यांना पक्षाध्यक्ष केले. प्रफुल्ल पटेल यांच्या या लेखाच्या अनुषंगाने खा. राऊत यांना नाशिकमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी या लेखाशी सहमती दर्शवतांनाच शरद पवारांच्या कार्यकर्तुत्वाचा खुल्या मनाने गौरव केला. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी करुन सत्ता स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर प्रथमच खा. राऊत यांनी काँग्रेसने शरद पवारांना रोखल्याचे प्रतिपादन केले. शरद पवारांच्या वाढदिवशी हे वक्तव्य केल्याने त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
शेतकरी आंदोलनावर बोलताना खा. राऊत म्हणाले की, सरकारने शेतकर्‍यांचे ऐकायला हवे. एक-दोन पाऊल मागे गेल्याने सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का बसत नाही. सरकार शरण गेले असे कोणी म्हणत नाही. अनेकदा कायद्यात बदल होतात, घटनेत बदल होतात, घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे. मोदी किंवा अमित शाहांनी नाही, त्यामुळे केलेला कायदा ब्रह्मवाक्य ठरत नाही, त्यामुळे त्या कायद्यातून शेतकर्‍याच्या फायद्याचे काही तरी घडेल असं करायला हवे, यालाच लोकशाही म्हणतात, आणीबाणी काही यापेक्षा वेगळी नव्हती, असेही पवारांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले राऊत?

  • ईडी किंवा सीबीआयसारख्या संस्थांनी केंद्राच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, या संस्था केंद्राला हवे तसे वागतात. माझ्याकडे १०० ते १२० लोकांची यादी आहे, यांना तात्काळ समन्स पाठवायला हवे, अटक व्हायला हवी, अशा लोकांची नावं सध्या माझ्याकडे आहे.
  • या निवडणुकीत भाजपचे बालेकिल्ले ढासळले, पदवीधर निवडणुकीत ते दिसून आले. जनतेचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. नाशिकसह बीएमसी शिवसेनेकडेच राहणार
  • शिर्डीत येणार्‍या साई भक्तांनी कोणते वस्त्रे परिधान करावीत हे ट्रस्ट कसे ठरवणार?
  • राज्यपाल समजदार आहेत, विधानपरिषदेचे आमदार ते लवकरच जाहीर करतील