घरताज्या घडामोडीपहाटेचा शपथविधी हा घोडेबाजारच होता

पहाटेचा शपथविधी हा घोडेबाजारच होता

Subscribe

खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती; जळगाव महापालिकेत झालेल्या घोडेबाजाराचे केले समर्थन

जळगावात घोडेबाजार झाला असा आरोप कोणी कोणावर केला? केला तर केला. त्यांनी नाही केला कधी? पहाटेची शपथ हा घोडेबाजारच होता. तो गाढवबाजार होता का, असा टोला शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी लगावला. महापालिकेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी सहा स्थानिक नेत्यांची समिती गठीत करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत पुढे म्हणाले की, भाजपने आजवर केलेल्या प्रकारांची परतफेड आम्ही जळगावमध्ये केली आहे. नाशिकमध्येही जळगाव पॅटर्न राबवायचा होता. परंतु आम्ही ठरवले येथे लोकशाही मार्गाने नगरसेवक निवडून आणू आणि वाजतगाजत पालिकेवर भगवा फडकवू. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशकात होते. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. शहराला नक्की काय हवे आहे, महापालिकेत सध्या कशी लुट सुरु आहे. कसे दरोडे पडताय, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काय चालले आहे याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. ती मी मुख्यमंत्र्यांसमोर सादर करणार आहे.तसेच यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणांवर भाष्य केलं. एनआयएला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. एनआयएला जो तपास करायचा आहे तो करु द्या. मुंबईचे पालीस, माहाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले. मुंबई पोलीस दल हे सक्षम आहे. पोलीस समर्थ आहेत. मुंबई पोलिसांना सक्षम नवं नेतृत्व मिळालं आहे. अनिल देशमुख यांच्या बदलीचे सध्या चित्र दिसत नाहीये. शरद पवार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
दिल्लीत भाजपचे हायकमांड आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते हायकमांडला मुजरा करायला गेले असतील. त्यामुळे यात काही नवे नाही. उद्या उद्धव ठाकरे जर देशाचे पंतप्रधान झाले, तर आम्हाला पण मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे लागेल. यावेळी पुढे बोलताना राऊत यांनी कोरोनावर भाष्य केले. कोरोना राज्यभरात वाढत आहे. माझी शिवसेनेच्या नेत्यांशी, पालिकांच्या नेत्यांशीही चर्चा केली. नाशिकच्या कोरोनावाढीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. राज्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. कारण राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत, असेही राऊत म्हणाले. यावेळी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार वसंत गिते, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सत्यभामा गाडेकर आदी उपस्थित होते.

पहाटेचा शपथविधी हा घोडेबाजारच होता
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -