आयएएस तुकाराम मुंढे जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आले तेव्हा त्या फाईली वर आल्या. यापुढे फाईली ढगात जाणार नाहीत, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये राणे नगर परिसरात झालेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की,महाराष्ट्रात वातावरण बदलतं आहे. नाशिकचे वातावरण बदलले की महाराष्ट्रातले वातावरण बदलते. अनेक जुने सहकारी पुन्हा पक्षात आले. देशासाठी बलिदान देण्याची नाशिकला मोठी परंपरा आहे. निवडणुका येता- जातात. निवडणुका येतात म्हणून आपण काम करतो असे नाही. आपल्या रक्तात सामाजिक कार्य आहे. शिवसेनेची ती परंपरा आहे. त्यामुळेच लोक आपल्यामागे उभे राहतात. मागचा काळ विसरुन गेला पाहिजे. आता नवीन पहाट होत आहे. आपण त्या दिशेने पुढे जाऊया, असेही खा. राऊत यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे आले फाईली डब्यात गेल्या, ठाकरे सरकार आले फाईली वर आल्या
खा. संजय राऊत यांचे मार्मिक वक्तव्य; राणे नगरात विकास कामांचा शुभारंभ
Related Story
- Advertisement -
- Advertisement -