घरठाणेठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंच शक्तिप्रदर्शन, उल्हासनगरात कार्यालयावर दगडफेक

ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंच शक्तिप्रदर्शन, उल्हासनगरात कार्यालयावर दगडफेक

Subscribe

बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती

राज्यभरात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह ४१ आमदारांविररोधात राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलने केली जात आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त करित आहेत. ठिकठिकाणी बंडखोर आमदारांचे नेतृत्त्व करणारे आमदार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आणि समर्थनार्थ बॅनर झळकत आहेत. यात आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील कॅम्प दोन भागातील मध्यवर्ती कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास चार ते पाच जणांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे. यावेळी आक्रमक कट्टर शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत आमदारांवर कारवाईची मागणा केली.

दरम्यान ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हे म्हणत एकनाथ शिंदे समर्थकांकडून पाठींबा दर्शवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने हातात बॅनर घेऊन शिंदे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

- Advertisement -

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. चौकाचौकात बंडखोर आमदारांविरोधात बॅनर पोस्टर झळकत आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 35 पेक्षा जास्त आमदारांनी पाठींबा दिला. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी काटे की टक्कर पाहायला मिळत आहेत. शिंदेंच्या बंडामुळे दुसरीकडे हजारो शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी आक्रमक शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांची कार्यालये फोडण्याचे प्रकार सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं आहे.

बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या अनेक संदेशांमध्ये आज दुपारी ४ वाजता शिंदे यांचे समर्थक त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोठ्या संख्येने जमणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने येथील रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मात्र तरी देखील मोठ्या संख्येने शिंदे समर्थक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहेत. यावेळी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील शिंदेना जाहीर पाठींबा दर्शवला आहे. यावेळी उपस्थित अनेकांच्या हातात शिवसेना पक्षाचे भगवे झेंडे, शिवसेनेचे दिवंगत पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे झळकवले.


शिवसेनेच्या ‘त्या’ 16 आमदारांना पुन्हा नोटीस, सोमवारपर्यंत उत्तर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -