घरमहाराष्ट्रकेंद्र सरकारला देव सुबुध्दी देवो, सुप्रिया सुळेंचा टोला

केंद्र सरकारला देव सुबुध्दी देवो, सुप्रिया सुळेंचा टोला

Subscribe

पेट्रोल, डिझेल आणि गँसच्या सह विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. याच प्रश्नावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात महागाई विरोधात आंदोलन केले. या आदोलनाला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला देव सुबुध्दी देओ, असा टोला केंद्र सरकारला लगावला.

महागाई हा अतीशय गंभीर प्रश्न आहे. करोडो महीलांना केंद्र सरकारने सिलेंडर मोफत दिले. पण ते रिफील करणे मोफत नाही हे कोणी सांगीतले नाही. पंतप्रधानांनी सांगीतल्यावर आपण सगळ्यांनी सिलेंडरवरची सबसीडी विश्वासाच्या नात्याने परत केली. याचा उपयोग गरीब लोकांना होणार असेल तर या देशातील सर्व लोकांनी गरीबांसाठी पंतप्रधांनाच्या शब्दावर विश्वास ठेऊन आपली संबसीडी सोडून दिली, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

मी जेव्हा संसद चालू होती तेव्हा सातत्याने बोलत होते की महागाईचा भडका वाडत आहे. कालपण आपण बघीतले असेल आरबीआयने इंटरेस्ट रेट वाडवले आहेत. या बद्दल मी बोलले होते. केंद्र सरकारला हे कसे दिसत नाही. याचे मला आश्चर्य वाटते. भारतातल्या लोकांना महागाई पासून वाचवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते महाविका आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस करेल, असे सुप्रिया सूळे म्हणाल्या.

सीएनजीचे हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने कमी केले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये फरक आहे. केंद्र सरकारने निर्णय घ्यायचे असतात. 2013-14 मध्ये मगाई जेव्हा वाढली होती. त्यावेळी ज्या पद्धतीने केंद्रातील आमच्या सरकारवर टीका झाली होती. त्यापेक्षा 4 पट जास्त महागाई झाली आहे. मला सुष्मा स्वराज यांचे त्यावेळचे भाषन आज ही आठवते. त्या म्हणाल्या होत्या आकडोसे पेट नही भरता. भूक लगती है तो धान लगता है. मला हाच प्रश्न केंद्र सरकारला विचारायचा आहे. देवेंद्रजींना खूप आनूभव आहे. ते विसरले असतील की केंद्रात भाजपचे सरकार आहे. जेव्हा आपचे सराकर तेव्हाची त्यांची भाषण आणि त्यांच्या नेत्यांची भाषण त्यांनी बघावीत. त्यांना महागाई कशामुळे वाढते हे समजते. त्यांना तेव्हडे अर्थशास्र नक्कीच समजते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

- Advertisement -

आपण देवाला आडचणीत नको टाकूया. पण देव केंद्र सरकारला सुबुद्धी येऊदे. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारने झोपायचे सोंग घेते आहे. केंद्र सरकार नकोत्या विषयाला महत्व देते आहे. हे दुदैवी आहे.माझी पंतप्रधानांना प्रांजळपणे विनंती आहे. एकमेकांवर आरोप करण्याची ही वेळ नाही. तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात. पक्षपात, विचारधार बाजूला ठेऊन सगळ्याचे मार्गदर्शन घ्या. महागाईचा भडका वाडत आहे. केंद्र सरकारने सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी आणि जनतेला महागाई पासून वाचवावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -