घरताज्या घडामोडीज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास प्राधान्य द्या; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास प्राधान्य द्या; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

'दिव्यांग व्यक्तीसह ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास प्राधान्य द्या', अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

जगभरात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या राज्यस्तरीय मोहिमेला सुरुवात झाली. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी ‘दिव्यांग व्यक्तीसह ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास प्राधान्य द्या’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणांवर मोठा ताण आला होता. परंतु, महाराष्ट्रात आपल्या कुशल नेतृत्वाखाली राज्याच्या आरोग्य विभागाने अतिशय उल्लेखनिय कार्य करुन देशापुढे एक आदर्श ठेवला, याबद्दल आपले आणि मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन”.

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या

“कोरोनाशी आजही आपण लढत आहोत. परंतु, आता यावरील लस उपलब्ध झाली, ही मोठी दिलासादायक बाब आहे. लसीकरणाला सुरुवात करताना लोकसंख्या आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे कर्मचारी यांचा विचार करता आपणास नम्र विनंती आहे की, लस गरजू घटकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावी यासाठी दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे”.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मी भरपूर खाज असलेला खासदार’; ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाच्या वादावर उदयनराजेंचं विधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -