खासदार सुप्रिया सुळे रविवारी नाशिक दौर्‍यावर

Supriya Sule

खासदार सुप्रिया सुळे रविवारी नाशिक दौर्‍यावर येत असून विविध संस्थांना त्या भेटी देणार आहेत. तसेच दुपारी त्या पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत. रविवारी सकाळी ९.३० वाजता भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी १० वाजता शहरातील चार्टड अकाऊंटट व संघटनेतील पदाधिकारी यांच्या सोबत सी ए भवन, अशोका शाळा येथे बैठक घेऊन संवाद साधणार आहे. सकाळी ११.१५ वा गंगापूर रोड येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे यशस्विनी सामाजिक अभियानातील पदाधिकारी व महिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी ३.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे साहित्य क्षेत्रातील महिलांशी त्या संवाद साधणार आहे. सायंकाळी ६ वाजता मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथील शेतकरी प्रकल्पास त्या भेट देणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.