माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, काही लपवायची गरज नाही; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

npc supriya sule

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे सध्या ईडीच्या रडावर आल्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. माझा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवयाची गरज नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांच्याशी संबंधीत कंपनीबाबत गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणी लवकरच चौकशी होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले, या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीचे खंडन केले.

रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. माझे रोहित यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना अद्याप नोटीस आलेली नाही. पण आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिका राहिलेली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवायची काही गरज नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकारी, बिल्डरांचे स्पेशल ऑडिट करा; सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी