घरताज्या घडामोडीपानपट्टीवरील बिडी मिळते तशी ईडीची अवस्था, खासदार उदयनराजे भोसले यांचा हल्लाबोल

पानपट्टीवरील बिडी मिळते तशी ईडीची अवस्था, खासदार उदयनराजे भोसले यांचा हल्लाबोल

Subscribe

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर आणि ई़डीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्याची परिस्थिती इतकी कुणी बिघडवली याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझं आवडतं कार्टुन टॉम अँड जेरी आहे. हे सुद्धा बघायचं मी बंद केलंय. आता सध्या सुरू असलेल्या राजकारण्यांच्या माकड उड्या बघत बसतो. मला खूप मजा येते. कोण-कोणाला आत टाकतंय. कोण कोणाला मारतंय हे बघतोय, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

पानपट्टीवरील बिडी मिळते तशी ईडीची अवस्था

या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. सारखे सारखे ईडी म्हणजे काय चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी ईडीची अवस्था झालीय. या सर्वांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी ईडीवर देखील हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

..मग काय लोकांना डोळे, मेंदू नाहीत असं वाटतंय का?

एका बाजूला लोक कसे जगताहेत आणि हे मात्र एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्ष जे जेलमध्ये होते त्यांनी काही केलेलं नाही. आता जे जेलमध्ये आहेत त्यांनीही काय केलेलं नाहीये. मग काय लोकांना डोळे, मेंदू नाहीत असं वाटतंय काय?, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.


हेही वाचा : मनसे ठाम ! ठरलेल्या ठिकाणी अन् वेळीच राज ठाकरेंची सभा, पोलीस आयुक्त भेटीनंतर बाळा नांदगावकरांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -