घरताज्या घडामोडीतुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा, खासदार उदयनराजेंचं अजित पवारांना...

तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा, खासदार उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान

Subscribe

ज्यावेळी तुम्ही साताऱ्यात मंत्री होता त्यावेळी का नाही सातारच्या एमआयडीसीचा विकास केला, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा, असं आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं आहे. उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांनी साताऱ्यातील एका भाषणामध्ये केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा

मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नाहीये. तर भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतोय. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जायला तयार राहा, असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांना केलं आहे.

- Advertisement -

तुम्ही तुमची जबाबदारी का नाही पार पाडली ?

तुम्ही त्या काळात साताऱ्याचे लोकप्रतिनिधी आणि मंत्री होता. त्यावेळी तुम्ही तुमची जबाबदारी का नाही पार पाडली ? ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता. या कंपन्या साताऱ्यातून जाण्यास कारणीभूत कोण आहे ? असं असताना खंडणी मागतो असा माझ्यावर आरोप केला जात आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

लोकप्रतिनिधी चांगले असतील तर कामं चांगली होतात, मात्र, लोकप्रतिनिधीच ठेकेदाराला पाठिशी घालत असतील, तर काम नीट होत नाहीत. सातारा एमआयडीसीचे उदाहरण समोर आहे, असं उदयनराजे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष शेलार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -