…मग शिवसेना माझी आहे असं म्हणू का?, खासदार उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल

भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कोणाची?, अशी श्रेयवादाची लढाई शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. मग शिवसेना माझी आहे असं म्हणू नका?, असा थेट सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. शिवसेना माझी आहे, असं म्हणू का?, छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते. येथे जाणता राजा देखील एकच आहे. शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालीये, मग काय मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

साताऱ्याने पहिल्यापासून महाराष्ट्राला नाही, तर देशाला दिशा दिलीय. साताऱ्यात सर्व चळवळी उभ्या राहिल्या होत्या. मी नेता नाहीये. वाटतेय का मी नेता असल्यासारखे, बघितलेय का, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनाच जातीयवादी म्हणता. पण मी जातपात बघत नाही. शिवाजी महाराजांनी देखील जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन, असं उदयनराजे भोसले म्हणाले.


हेही वाचा : …तर शहीद झालो असतो, एकनाथ शिंदेंची धक्कादायक माहिती