घरताज्या घडामोडीउदयनराजे कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

उदयनराजे कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

Subscribe

चार दिवसांपूर्वी दिल्लीहून परतल्यानंतर जाणवू लागला त्रास

राज्यसभेमधील भाजपची बुलंद तोफ खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना कोरोनाचा संसर्ग झाला. चार दिवसांपूर्वीच ते दिल्लीहून परतले आणि त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता. कोरोना चाचणीनंतर त्यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही माहिती समजताच दिल्लीत अधिवेशनासाठी गेलेले खासदार उदयनराजे तातडीने पुण्यात आले. मात्र, संपर्कात आल्याने त्यांनाही कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे खासदार उदयनराजेंनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -