मुख्यमंत्र्यांचा आज माईक ओढला, उद्या पँट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

vinayak raut

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला नवं सरकार मिळालं आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी कॅबिनेटच्या शपथविधीवरून आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओढलेल्या माईकवरून सर्वत्र टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू असताना फडणवीसांनी थेट त्यांच्यासमोरून माईक काढून घेतला होता. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा आज माईक ओढला, उद्या पँट ओढतील, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज कोल्हापुरात फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हे घटकेचं राज्य सहा महिने टिकलं तर नशीब असे म्हणत आज माईक ओढत आहेत. आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील. तसेच जे बंडखोर आहेत त्यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही, अशी घणाघाती टीका विनायक राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

हे सरकार किती दिवस चालेल हे माहीत नाही

माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माईक ओढाओढीवरून शिंदे-फडणवीस यांना डिवचलं आहे. सत्ता येते जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाहीये. हे सरकार किती दिवस चालेल हे माहीत नाही, आज माईकवरून ओढा-ओढी सुरू आहे. उद्या काय ओढतील याचा भरोसा नाही, असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : कोण कसा विचार करतो माहीत नाही, फडणवीस-राज भेटीवरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया