घरताज्या घडामोडीहा फडणवीस आणि बावनकुळेंचा पराभव..; नागपुरात भाजपला दणका दिल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

हा फडणवीस आणि बावनकुळेंचा पराभव..; नागपुरात भाजपला दणका दिल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

Subscribe

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४ हजार ७१ तर नागो गाणार यांना ६ हजार ३०९ मतं मिळाली आहेत. दरम्यान, नागपुरात भाजपला महाविकास आघाडीने दणका दिल्यानंतर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरमधील भाजपाचा पराभव हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नागपूर विधानपरिषेदची निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्यासारख्या नेत्यांचे राजकीय प्रस्थ असलेला हा मतदारसंघ आहे. परंतु या मतदारसंघात भाजप आणि मिंधे गटाचा पराभव करून अडबाले यांचा विजय झाला आहे. त्यामुळे हा फडणवीस आणि बावनकुळेंचा पराभव आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

मिंधे सरकारपेक्षा महाविकास आघाडीवर जास्त प्रेम असल्याचे नागपुरमधील सर्व मतदारांनी दाखवून दिलं आहे, असंही विनायक राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे प्रारंभापासून आघाडीवर होते. दुसरीकडे अपक्ष उमेदवार अजय भोयर यांनाही लक्षणीय मते मिळाली होती. दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले या तिघांत थेट लढत राहिल असे चित्र होते. मात्र, प्रत्यक्षात अडबाले आणि गाणार यांच्यातच लढत असल्याचे दिसून आले. अजय भोयर यांच्यामुळे नागो गाणार यांना मिळणाऱ्या मतांमध्ये विभाजन झाल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नागपुरात भाजप भुईसपाट, नागो गाणारांची हॅटट्रिक हुकली; मविआचा दणदणीत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -